Share

औरंगाबादेत कोरोनाचे ३८८ रुग्ण, पाच जणांचा मृत्यू; ५५० जणांना दिला डिस्चार्ज

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या आणखी ३८८ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मनपा क्षेत्रात ३५७, तर ग्रामीण भागात ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर सोमावारी एकाच दिवसात ५५० जणांना यशस्वी उपचारानंत डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ हजार ३५७ वर पोहोचली आहे. यातील ४९ हजार ९ रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घाटीत हर्सूल येथील भगतसिंगनगरातील ७६ वर्षीय पुरुष, वैजापूर तालुक्यातील तालखेड येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील बिलालनगरातील ५८ वर्षीय पुरुष, औरंगाबाद शहरातील शिवनेरी कॉलनीतील ६० वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सरकारी कार्यालयातील अँटिजन चाचणीत १३ पॉझिटिव्ह
औरंगाबाद शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय कार्यालयात अभ्यागतांची चाचणी करण्यात येत आहे. सोमवारी मनपा मुख्यालयात २७ जणांच्या तपासणीत तीन जण पॉझिटिव्ह अाढळले. पोलिस आयुक्तालयात ३२ पैकी एक, जिल्हाधिकारी कार्यालयात ६३ पैकी दोन, विभागीय आयुक्तालयात ९४ पैकी दोन जण, तर आरटीओ कार्यालयात केलेल्या तपासणीत १४३ पैकी पाच जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!