Share

वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर अत्याचार; २० वर्षे सक्तमजुरी

Published On: 

औरंगाबाद : वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी विविध कलमांखाली २० वर्षे सक्तमजुरी व ८९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले.

दरम्यान, ३१ जुलै २०१८ रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने आरोपी बंडू रोहिदास राठोड विरोधात तक्रार दाखल केली होती. बंडूने ३० जुलै २०१८ रोजी सात वर्षीय मुलीला वडापाव खाण्यासाठी तिच्या आईला विचारून नेले. मात्र बराच वेळ झाला तरी हे दोघे परतले नाहीत. त्यामुळे आईने तिचा शाोधही घेतला. दुसरा दिवस उजाडला तरी ते आले नाहीत. मात्र बंडू ओळखीचा असल्याने तो आज मुलीला आणून सोडेल, या आशेने आई मयूर पार्क येथे कामाला गेली.

दरम्यान, बंडूने पीडितेला गिरनार तांडा भागात नेऊन पोटात, डोक्यात मारहाण करून अत्याचार केले. त्यानंनंतर तो तिला तेथेच सोडून निघून गेला. रात्रभर ती एका शेतात थांबली. सकाळी एका म्हशीपालकाने तिला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी बंडूला अटक केली. त्यानंतर न्यायालयात १० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये पीडिता, फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीचे जबाब महत्त्वाचे ठरले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!