औरंगाबाद : शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी विधान परिषदेत मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाबाबाद मुद्दा उपस्थीत केला. पश्चिम वाहिनी नद्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याच्या योजनेतून मराठवाड्याला किती पाणी मिळणार, त्याचा डीपीआर कधी मंजूर होणार, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला, त्याला सतीश चव्हाण, विनायक मेटे, अमर राजूरकर या मराठवाड्यातील आमदारांनी समर्थन देत सरकारला प्रश्न विचारले. या प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेऊन सभापती रामराजे निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मराठवाड्यातील सर्व आमदारांची या विषयावर एकत्रित बैठक घेण्याच्या सूचना दिल्या.
दानवे म्हणाले, ‘शासन १६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात सोडणार होते त्यापैकी मराठवाड्याला किती पाणी उपलब्ध करुन देण्यात आले?’ ‘जलसंपदा मंत्र्यानी दिलेल्या प्रश्नावर समाधान होत नाही. मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला जातो का? अशी आमची शंका आहे. शासनाकडे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा दीड वर्षापुर्वी अहवाल देण्यात आलेला आहे. मात्र अजून डीपीआर मंजूर का केला जात नाही? त्याला मान्यता का दिली जात नाही? डीपीआर अधिवेशन संपायच्या अगोदरच मान्यता मिळाली तर आगामी काळात कामे सुरु होण्यास वेग येईल.
दरम्यान, आमदारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, ‘मराठवाडा आणि गिरणा उपखोऱ्यासाठी कोकणामधून पाणी वळवण्याच्या योजनांना २०१९मध्ये मंजुरी दिली आहे. पश्चिम वाहिनी नद्यातून गोदावरी खोऱ्यात १६८ टीएमसी पाणी वळवण्याच्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यापुर्वी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने समितीने ३१ ऑक्टोबर २०१९ ला अहवाल दिला. त्यानंतर पुन्हा कार्यकारी संचालक कोकण पाटंबधारे महामंडळाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्यांचा अभ्यास सुरु आहे. हा अहवाल आल्यानंतर मराठवाड्याला किती पाणी मिळणार हे स्पष्ट होईल.’
महत्वाच्या बातम्या
- मराठवाडा वॉटरग्रीड बंदकरण्याचे पाप करणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
- ‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’, दरेकरांची अर्थसंकल्पावरून टीका
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

