परभणी : लग्नसोहळा आटोपून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या इनोव्हा कारला ट्रॅक्टर आणि ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. झिरोफाटा-पुर्णा रस्त्यावर सोमवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
सेलू येथून विवाह सोहळा आटोपून पूर्णा तालुक्यातील गौर येथील वऱ्हाड गावाच्या दिशेने परत जात होते. झिरोफाटा-पुर्णा रस्त्यावर एक ट्रॅक्टर आणि एक ट्रक कातनेश्वरजवळ झिरोफाट्याकडे जात होती. त्याच वेळी समोरून इनोव्हा कार येत होती. ट्रॅक्टरचालकाने अचानकच समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अपघातानांतर ट्रॅक्टर रोडच्या कडेला जाऊन पडले. याच्यानंतर काही क्षणातच पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकनेही अपघातग्रस्त इनोव्हा कारला धडक दिली.
दरम्यान, एकापाठोपाठ वाहनांचे जोरदार आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. तोपर्यंत वऱ्हाडातील मागचे वाहने देखील घटनास्थळी पोहोचले. जखमींना तात्काळ वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले. मात्र, इनोव्हामधील जखमी किशनराव विठ्ठलराव पारवे (७०, रा. गौर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कारचालक कालीदास केशव पारवे, कोंडीराम पारवे, सुरेश पारवे, धोंडिराम पारवे, वैजनाथ पारवे, प्रभाकर पारवे हे जखमी झाले.
महत्वाच्या बातम्या
- मराठवाडा वॉटरग्रीड बंदकरण्याचे पाप करणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
- मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाबाबत विधान परिषदेत आमदार आक्रमक, एकत्रीत बैठक घेण्याची सभापतींची सूचना
- ‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’, दरेकरांची अर्थसंकल्पावरून टीका
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

