Share

मराठवाडा वॉटरग्रीड बंदकरण्याचे पाप करणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाडा वॉटरग्रीडचे काम बंद करण्याचे पाप आम्ही करणार नाही, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे नेण्याची मागणी आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, सुधीर मुनगंटीवार, उदयसिंह राजपूत, राणा जगजितसिंह, किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. त्याला उत्तर देताना मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प तत्काळ सुरू करण्याबाबत शासनाकडे मागणी केली असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून ग्रीड प्रस्तावित करणे तसेच उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उजनी, सीना-कोळेगाव, निम्न तेरणा धरणातून ग्रीड प्रस्तावित करणे यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय ग्रीडच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प तत्काळ सुरू करण्याबाबत शासनाकडे मागणी केली आहे. हे ग्रीडचे काम बंद करण्याचे पाप आम्ही करणार नाही, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे आमदारांनी मराठवाडा वॉटरग्रीड उभारण्याचे काम प्रलंबित असल्याचे सांगत हे काम पूर्णत्वाकडे नेण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्राथमिक संकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या २३ फेब्रुवारी २०२० च्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यांना जायकवाडीतून ग्रीड प्रस्तावित करणे आदींची कार्यवाही सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!