🕒 1 min read
मुंबई : टीव्हीवरील मराठी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून घराघरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. दरम्यान त्याने भाऊ कदमसोबत गाण्याचा व्हिडिओ शेअर करून लाखों प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आता पुन्हा एकदा विनोदी कलाकार कुशल चर्चत आला आहे.
कुशलने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो एका गवताळ प्रदेशात असल्याचे दिसते. त्याने चालत असतानाची एक पोझ देत फोटो काढला आहे. तसेच फोटोमध्ये मागे रॉयल एनफिल्ड गाडी देखील आहे. कुशलने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘वाट फुटेल तिथे जाणं मला मान्य नाही, आपली वाट आपण शोधावी. म्हणजे हवं तिथे पोहोचुच असं नाही. पण प्रवास मात्र सुंदर होतो हे नक्की.’त्याचे हे लक्षवेधी कॅप्शन सर्वांनाच आवडले आहे. त्याच्या कॅप्शनचे कौतुक करत ‘कॅप्शनने ह्रदय जिंकलं रे कुशल दादा’ ‘परफेक्ट लिहिले आहे सर’,’दोन रॉयल एक समोर तर दुसरा मागे.., अशा कमेंटस् येत आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी त्याला हार्ट आणि फायर ईमोजी देखील पाठवले आहेत.
https://www.instagram.com/p/CVE_VKWI7FV/?utm_medium=copy_link
कुशल बद्रिके यांनी आजवर अनेक नाटके, चित्रपट तसेच कार्यक्रमांमध्ये अभिनय केलेला आहे. ‘एक होता काऊ’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘भाऊचा धक्का’, ‘जत्रा’ या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो ‘चला हवा येऊ द्या’मधून त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.मात्र त्याच्या फोटोवरील ओळींनी तसेच कमेंटमुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांना आता नवीन माफिया साथीदार मिळाला, तो म्हणजे उद्धव ठाकरे’; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं – पडळकर
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
- तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; सिंघू बॉर्डर खाली करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
