लातूर : चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीन साठवणूक शेतकऱ्यांनी केली आहे. सोयाबीन दराचे काय होणार? कमी होतील की वाढतील? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीन हे 7 हजार 350 वर स्थिरावले आहेत. त्यामुळे आवकवरही त्याचा परिणाम मोठा झाला होता. मंगळवारी मात्र यामध्ये बदल झाला आहे. सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली असून त्याचा परिणाम आवकवर होणार आहे असे चित्र दिसत आहे.
दर स्थिर असल्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसात 18 ते 20 हजार पोत्यांची आवक ही सुरुच होती. असे असले तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन हे राखून ठेवलेले आहेत. हंगामाच्या शेवटी सोयाबीनमध्ये विक्रमी वाढ होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
100 रुपयांनी दरात घसरण –
सोयाबीनच्या दराचे काय झाले? दर कसे आहेत? याची उत्सुकता सर्वानाच लागलेली आहे. सोयाबीनबाबत सावध भूमिका बाळगली जात आहे. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 7 हजार 350 वरील 7 हजार 250 आले आहेत. त्यामुळे असेच टप्प्याटप्प्याने दर कमी झाले तर हे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ठरेल. मध्यंतरी 7 हजार 600 वर गेलेले सोयाबीन आता 7 हजार 250 रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन साठवणुकीचा निर्णय बरोबर की चुकीचा हे येणारा काळच ठरवणार असे दिसत आहे.
हरभरा खरेदी केंद्रावर –
राज्यात सर्वत्र आता हरभरा खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. आतापर्यंत शेतकरी हे खुल्या बाजारात हरभऱ्याची विक्री करीत होते. पण बाजारपेठेतील दरात सुधारणा नाही शिवाय खरेदी केंद्राच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी हरभरा विक्रीची सोय झाली आहे. त्यामुळे केंद्रावरील वाढते दर आणि गावाजवळच झालेली सोय यामुळे हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची रेलचेल पाहवयास मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –


