Share

नीरज चोप्राने घेतली ‘या’ खास अभिनेत्याची भेट

Published On: 

मुंबई : नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ही गोल्डन कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल आहे. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं एथलिटिक्समधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल ठरले आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातील लोक त्याचं कौतुक करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने देखील आता नीरज चोप्राची भेट घेतली आहे. नुकताच रणदीपने नीरजसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन देखील दिले आहे. विशेष म्हणजे  हे दोघेही हरियाणाचे आहेत.

रणदीप हुड्डाने ट्विट करत लिहीले की, “कसुटा मानस. नायुये धुम्मा सा ठंडा रहा. वरून कोठे जातो? खूप कमी लोकांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागते आणि फार कमी लोकांकडे याचे उत्तर असते. पण, खोलवर मला वाटते की तू भाऊ हे डिजव्ह करतो. ” असे म्हणत रणदीपचे कौतुक केले आहे.

याआधी नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया देत सांगितले की, ‘माझ्या बायोपिकमध्ये मला हरियाणाचा रणदीप हुड्डाला पाहायला आवडेल. बॉलिवूडमधून अक्षय कुमारही मला खूप आवडतो’, असं नीरज चोप्राने यावेळी सांगितले. त्यामुळे नीरजने रणदीप भेट घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!