Share

Neeraj Chopra : नीरज चोप्राने पुन्हा एकदा रचला इतिहास; जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक!

Published On: 

मुंबई : भारताच्या नीरज चोप्राने अमेरिकेतील यूजीन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने भालाफेक स्पर्धेत ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदक जिंकले आहे. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये लांब उडी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. पण, नीरजने त्याच्या एक पाऊल पुढे टाकत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. नीरजने भालाफेक पात्रता फेरीत पहिल्याच थ्रोमध्ये ८८.३९ मीटर अंतरावर भालाफेक करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. पात्रता गट-अ मध्ये तो प्रथम आणि एकंदरीत द्वितीय राहिला होता. ग्रेनेडाच्या विद्यमान विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सने सुवर्णपदक जिंकले. त्याने हे पदक जिंकताना ९०.४६ मीटर भालाफेक केली.

यापूर्वी, नीरजने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या पदकासह त्याने वैयक्तिक खेळांमध्ये भारताचा १२० वर्षांचा दुष्काळ संपवला होता. भारतासाठी ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. आता त्याने जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. नीरजपूर्वी कोणत्याही आशियाई खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये पदक मिळाले नव्हते. त्याचबरोबर जागतिक चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकणारा तो पहिला खेळाडूही ठरला आहे.

टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राने १४ जून रोजी पाओ नॉर्मी गेम्समध्ये ८९.३० मीटर भालाफेक केली, तर १८ जून रोजी कुआर्तने गेम्समध्ये ८६.७९ मीटर भालाफेक केली होती. त्याचबरोबर डायमंड लीगमध्ये नीरजचा भाला ८९.९४ मीटर अंतर कापण्यात यशस्वी ठरला होता. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप थ्रोच्या अंतिम फेरीत नीरजला क्वालिफायरसारखी कामगिरी करता आली नाही.

नीरजने पात्रता फेरीत ८८.३९ मीटर अंतरावर भालाफेक करून अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले होते. मात्र, अंतिम फेरीत तो एकाही थ्रोमध्ये हे अंतर पार करू शकला नाही. अंतिम फेरीतील त्याचा सर्वोत्तम थ्रो ८८.१३ मीटर होता आणि यामुळे तो रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला. नीरजचा पहिला थ्रो फाऊल झाला होता. त्याने दुसऱ्या थ्रोमध्ये८२.३९ मीटर, तर तिसऱ्या थ्रोमध्ये ८६.३७ मीटर आणि चौथ्या थ्रोमध्ये ८८.१३ मीटर अंतर पार केले होते. यानंतर त्याचे पाचवे आणि सहावे थ्रो फाऊल राहिले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!