मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना मँचेस्टर येथे खेळवला जाईल. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत सध्या दोन्हीही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे आजच्या शेवटच्या सामन्यात जो संघ बाजी मारेल तोच मालिकेचा बाजीगर ठरेल. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने पलटवार करत तब्बल १०० धावांनी भारतीय संघाचा पराभव केला होता. भारतीय संघ मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.
इंग्लंड विरुद्धच्या आजच्या एकदिवसीय सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली एक महिना क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे चाहत्यांना कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर आतापर्यंत त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीकाही उमटल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात सर्वच चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीच्या फलंदाजीवर असणार आहेत. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर रोहित दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. या सामन्यात रोहित शर्मावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असणार आहे. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी संघात मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे.
Captain @ImRo45 wins the toss and we will bowl first in the third and final ODI.
Live – https://t.co/qaVcGcMElB #ENGvIND pic.twitter.com/zmJ8FNMRSK
— BCCI (@BCCI) July 17, 2022
असे आहेत दोन्हीही संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टोप्ले
महत्वाच्या बातम्या :
- Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार; दीपाली सय्यदांचा मोठा दावा
- PV Sindhu : शाब्बास पीव्ही सिंधू! पटकावलं सिंगापूर ओपन २०२२ मध्ये विजेतेपद
- Mahesh Tapase | मुख्यमंत्र्यांनी जाणून – बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवला – महेश तपासे
- CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी ‘ती’ योजना कार्यान्वित करणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Deepali Sayed : संजय राऊत, शांतता घ्या, ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्या; दिपाली सय्यद यांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

