Share

IND vs ENG : सिराज जोमात इंग्लंड कोमात! जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मिळालं स्थान

Published On: 

मुंबई : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज एकदिवशीय मालिकेतील शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज दमदार गोलंदाजी करत आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या पहिल्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या सिराजने दमदार गोलंदाजी केली. त्याने एकाच षटकात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय सिराजने या षटकात २ गडी बाद करत एकही धाव दिली नाही. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट हे दोघेही शून्यावरच बाद झाले. सिराजच्या दमदार गोलंदाजीमुळे सुरुवातीलाच इंग्लंडची अवस्था २ षटकांत १२ धावांवर २ गडी बाद अशी झाली होती.

जसप्रीत बुमराहच्या पाठीत वेदाना होत असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नसल्याचे रोहितने सांगितले. शिवाय भविष्याच्या दृष्टीने बुमराहसाठी आराम गरजेचा आहे, याच कारणास्तव त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेले नाही, असे रोहितने स्पष्ट केले. याशिवाय आशिया चषकाअगोदर भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्येही जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे बुमराह आता थेट आशिया चषकात टीम इंडियात खेळताना दिसेल. शिवाय भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही वेस्टइंडीज दौऱ्यातून आराम देण्यात आला आहे.

सध्या भारत विरुद्ध एकदिवसीय सामन्यात इंग्लंड ८ षटकांत ५९ धावांवर २ गडी बाद अशा स्थितीत आहे. सलामीवीर फलंदाज जेसन रॉय २१ चेंडूत ३५ धावांवर खेळत आहे. तर बेन स्टोक्स २१ चेंडूत २३ धावांवर खेळत आहे.

आजच्या सामन्यात असे आहेत दोन्हीही संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टोप्ले

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!