मुंबई : विराट कोहली सध्या अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे. कोहलीच्या खराब कामगिरीवर अनेकांनी टीकाही केली आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने विराटबद्दल सहानुभूती दर्शवली आणि त्याचे सांत्वन केले होते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना बाबरने कोहलीचा एक जबरदस्त विक्रम मोडला आहे. सर्वात वेगवान (डावांच्या बाबतीत) दहा हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा बाबर आझम आशिया खंडातील पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.
बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम
बाबर आझमने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील तिन्ही फॉरमॅटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करताना तो सर्वात वेगवान (डावाच्या बाबतीत) १०,००० धावा पूर्ण करणारा आशियाई फलंदाज बनला आहे. बाबर आझमने २२८ डावांत दहा हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. तर विराट कोहलीने ही कामगिरी २३२ डावांत पूर्ण केली होती. या यादीत बाबर आझमने आता विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
सर्वात कमी डावात १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारे टॉप ५ आशियाई फलंदाज
बाबर आझम – २२८ डाव
विराट कोहली – २३२ डाव
सुनील गावसकर – २४३ डाव
जावेद मियांदाद – ४४८ डाव
सौरव गांगुली – २५३ डाव
???? 1⃣0⃣,0⃣0⃣0⃣ international runs ????
Congratulations skipper @babarazam258 on becoming the 11th ???????? batter to accomplish this major milestone ????#SLvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/hQV28gmn9O
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 17, 2022
बाबर आझम जगातील पाचवा फलंदाज
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद दहा हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत बाबर आझम पाचव्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या नावावर आहे, ज्यांनी २०६ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
Babar Azam is in a league of his own ????#WTC23 | #SLvPAK pic.twitter.com/AOWBhDFrkg
— ICC (@ICC) July 17, 2022
सर्वात जलद १०,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारे टॉप ५ फलंदाज
व्हिव्ह रिचर्ड्स – २०६ डाव
हाशिम आमला – २१७ डाव
ब्रायन लारा – २२० डाव
जो रूट – २२२ डाव
बाबर आझम – २२८ डाव
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG : निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- Deepali Sayed : “शिवसेनेतील दोन्ही गटांना पुन्हा एकत्र यायचंय, पण…”- दीपाली सय्यद
- Prakash Ambedkar : “काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण…”, प्रकाश आंबेडकरांची टीका
- Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार; दीपाली सय्यदांचा मोठा दावा
- PV Sindhu : शाब्बास पीव्ही सिंधू! पटकावलं सिंगापूर ओपन २०२२ मध्ये विजेतेपद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

