🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर शेती उद्योगात व्यस्त आहे. १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. धोनीने जरी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असती तरी जाहिरातविश्वातुन धोनीने अजूनही निवृत्ती घेतलेली नाही.
त्यातच एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीसाठी आता धोनीसह त्याची मुलगी झिवा हिलाही अभिनयाची संधी मिळाली आहे. झिवाला वयाच्या पाचव्या वर्षीच आपली पहिली जाहिरात मिळाली आहे. बाबा धोनी आणि लेक झिवा हे दोघेही एका ख्यातनाम अशा उत्पादनाच्या जाहिरातीत दिसत आहेत.
झिवा जन्मपासूनच चर्चेत राहिली आहे. झिवाचा फार मोठा चाहतावर्ग आहे. झिवाचे इन्स्टाग्रामवर एक अकाऊंट आहे. १.८ दशलक्ष फॉलोअर्स या सोशल मीडियावर साईटवर आहेत. तिच्या अकाऊंटवरून तिचे स्वत:चे आणि धोनी-साक्षीसोबतचे फोटो पोस्ट केले जातात. मोठ्या प्रमाणात लाईक्स या फोटो आणि व्हिडीओंना मिळत असतात.
झिवाने आताच बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली आहे. या जाहिरातीमध्ये बाबा धोनी आणि मुलगी झिवा दोघांची चांगली केमेस्ट्री दिसत आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना धोनी आणि झिवाची हि जाहिरात फार आवडली आहे. या जाहिरातीनंतर झिवा बाल कलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- …तर महाराष्ट्राचेही नामांतर करा; महाविकास आघाडीतील घटक पक्षाची राज्य सरकारकडे मागणी
- फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे
- गिरीश महाजन अडचणी वाढल्या; पुण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
