मुंबई- एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधान परिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे.
बुधवारी दुपारी जयंत पाटील यांनी शिरोळ येथील शेट्टींच्या घरी भेट घेत त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. राज्यपाल नियुक्त म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टींना आमदारकी द्यायची असा विचार सुरू असून शेट्टी याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय माझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला आहे, पण येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ असे राजू शेट्टी माध्यमांना सांगितले.
या ऑफरबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री होण्याची क्षमता असणारे राजू शेट्टी आमदारकीची ती सुद्धा राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर स्वीकारणार का याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. फक्त आमदारकी मिळवून ते शेतकऱ्यांच्या समस्या कश्या सोडविणार हे देखील पाहावं लागणार आहे. याशिवाय विद्यमान कृषिमंत्री आपली विशेष छाप सोडण्यात अजून तरी यशस्वी झालेले नाहीत त्यामुळे शेट्टी यांना कृषीमंत्री पद दिले जाणार का याबाबत देखील सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे.
मीच भुज’बळ’… मंत्रीमंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे, मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून शेलारांचा टोला
ज्यांना शेतकऱ्यांनी पाडले त्यांनी चिंता करावी,पाशा पटेलांचा राजू शेट्टींना टोला
दारु विक्री चालू आणि व्यायामशाळा बंद का? राज्यभरातील जीम सुरु करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

