मुंबई : मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाचा एक प्रस्ताव त्यांना माहिती नसताना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला. त्यावरून मंत्रिमंडळात प्रचंड खडाजंगी झाली आणि शेवटी तो प्रस्ताव मागे घेण्यात आला.
भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्या हलचाली
दरम्यान, या मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
“महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू
मंत्री मोठा की, सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ
शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल.. भिजला तर भिजू द
मीच भुज’बळ’…मंत्री मंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे
भाजीसह आंबा,कापूस, तूर, केळी उध्वस्त संत्री
महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री!”
महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू
मंत्री मोठा की, सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ
शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल.. भिजला तर भिजू दे
मीच भुज"बळ"…मंत्री मंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे
भाजीसह आंबा,कापूस, तूर, केळी उध्वस्त संत्री
महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 10, 2020
दरम्यान, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी हंगामाचा गहू किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना न सांगतात थेट मंत्रिमंडळ बैठकीत मांडला गेला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याचे काम मंत्र्यांनी करायचे असते. पण हा प्रस्ताव थेट सचिवांनी मांडायला सुरुवात केली. तेव्हा छगन भुजबळ यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला.
दिलासादायक : राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण बरे होऊन गेले घरी
मी या विभागाचा मंत्री आहे की नाही? ते आधी स्पष्ट करा मग हा प्रस्ताव मांडा, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. त्यानंतर सर्वच मंत्र्यानी आक्षेप घेतले. मंत्र्यांना अंधारात ठेवून प्रस्ताव आणण्याची हिंमत होते कशी असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. तर माजी मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळात कोणते प्रस्ताव आणायचे हे नोकरशाही ठरवणार का? असा सवाल केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

