औरंगाबाद: राज्य कृषी मुल्य आयोगाचा मी अध्यक्ष आहे. मला जिथं धोरण ठरतात. तिथं बोलायची संधी आहे. मी जे विषय देतो त्यावर चर्चा होते. राजू शेट्टी हे माझे ज्युनिअर आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना राजू शेट्टी तालुका अध्यक्ष होते, म्हणजेच गुरु-गुरु असतो. हे शेट्टी यांनी समजून घ्यावेत. असा टोला पाशा पटेल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना लगावला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा राजू शेट्टी म्हणाले होते, पाशा पटेल यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता आहे. शेतकऱ्यांची चिंता नाही. या आरोपावर पाशा पटेल यांनी खरमरीक उत्तर दिले.
पटेल म्हणाले,मला माझ्या भविष्यांची चिंता नाही, मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चिंता आहे. मी निवडणुक लढवलो नाही, मला शेतकऱ्यांनी पाडलंही नाही. ज्यांना शेतकऱ्यांनी पाडले. त्यांनी चिंता करावी असा टोला राज्य कुषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना लगावला.
हवामानातील बदल आणि ढगफुटी आणि दुष्काळ यांचा मी अभ्यास करत आहे. यामूळे माझी चिंता करण्याऐवजी शेतकऱ्यांनी का पाडलं याची चिंता राजू शेट्टी यांनी करावी. लोकसभा निवडणुकीच्या काळात एक गोष्ट पाहीला मिळाली की,ज्या गावात स्वाभिमानी पक्षाची इतर पक्षाला प्रवेश देत नव्हते. त्यांच गावात राजू शेट्टींना प्रवेश दिला नाही. एवढा शेतकऱ्यांमध्ये अविश्वास का झाला. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या संघटनेप्रमाणेच राजू शेट्टी यांच्या संघटनेनेही उभारी घेतली होती. मात्र त्यांचे सहकारी का सोडून चाललेत. यांची शेट्टी यांनी यांचे चिंतन करावेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

