पुणे – देशभरात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्यापैकी एक म्हणजे लॉकडाऊन. या लॉकडाऊनचा मोठा परिणाम समाजातील विविध घटकांवर होताना पाहायला मिळत आहे.
आता अनलॉक-१ सुरु झाले आहे आणि यातून अनेक घटकांना सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यायामशाळा सुरु ठेवण्यावर देखील बंदी घालण्यात आली होती. आता याच व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. पुण्यात सुमारे अडीच हजार व्यायामशाळा आहेत. यातील मोठ्यापासून लहान सर्व प्रकारच्या व्यायामशाळांचा समावेश आहे. व्यायाम बंद असल्यामुळे अनेक तरुणांसमोर आरोग्यवर्धनाचा प्रश्न आहे.
सध्या कोरोनाशी झुंजायच तर शारीरीक तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. तरी आरोग्य हिताच्या दृष्टीने योग्य अशी बंधने , व अटी घालून व्यायामशाळा पुन्हा चालू कराव्यात अशी मागणी समस्त हिंदू आघाडी तर्फे राज्यसरकार कडे करण्यात आली. मिलींद एकबोटे यांनी तसे पत्रक काढले आहे.
व्यायामशाळा या एका घटकावर जीम ट्रेनर , प्रशिक्षक, क्रिडा मार्गदर्शक , सहायक मदतनीस, डाएट फुड विक्रेते व्यावसायिक व्यायाम साहित्य बनवणारे कारखाने जिम, तालिम यांच्या साफसफाई, विज, यंत्रणा यांच्याशी जोडलेले कर्मचारी वर्गातील लोकं या साऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. अर्थिक गणिताच्या नावाखाली दारु विक्री चालू आहे मात्र व्यायामशाळा बंद… हे चित्र आहे. शारीरीक तंदुरुस्तीचा विचार करुन तालिम व जीम सुरु कराव्यात’ अशी भुमिका संघटनेचे प्रवक्ते सौरभ कर्डे यांनी मांडली.
पवार, फडणवीसांनंतर आता आठवले निघाले कोकण दौऱ्यावर
राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; आजपासुन राज्याच्या सीमा बंद
अनलॉक १ : राज्यात ३० जूनपर्यंत ‘हे’ सर्व बंदच राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

