टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. तसेच ही दडपशाही असल्याचं म्हटलं आहे.
यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे. कोल्हे यांनी मोदी सरकारने कलम ३७० हटविले, या निर्णयाचे स्वागत. काश्मीरच्या विकासाचे कौतुक आहे. मात्र हा निर्णय घेत असताना ढासळलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा तर प्रयत्न तर होत नाही ना? याचाही डोळसपणे विचार करायला हवा असं कोल्हे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना निवडणुकीनंतर सातत्याने शेअर बाजार गडगडत आहे. आयएल अँड एफएस सारख्या कंपनीने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडविले आहेत. अनेक उद्योजकांनी सरकारी बँकाचे कोट्यवधी बुडविले आहेत. अर्थव्यवस्थेचे अपयश झाकण्यासाठी जर ३७० हटविले गेले असेल तर आपण हा प्रश्न वारंवार सरकारला विचारला पाहीजे असंही कोल्हे म्हणाले.
दरम्यान अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला. यानंतर झालेल्या जुन्नर येथील सभेत अमोल कोल्हे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेची खिल्ली उडवत टीका केली. काही लोक संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतात जात आहेत. मात्र त्यांची अवस्था, ‘बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं’ अशी झाली असल्याचे सांगत असताना आदित्य ठाकरे यांना नाव घेता टोला लगावला आहे.
शिवस्वराज्य यात्रा : पुढचा मुख्यमंत्री आघाडीचाचं – अमोल कोल्हे
पश्चिम बंगालचे विभाजन करून, दार्जिलिंग केंद्रशासीत प्रदेश करा : राजू बिस्ता
कलम ३७० हटवणे म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका : राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

