टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजप आणि शिवसेना जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला. या यात्रेविषयी बोलताना अमोल कोल्हे यांनी ‘शिवसेना आणि भाजपच्या यात्रेमध्ये कुणी ना कुणी मुख्यमंत्री पदावर दावा करत आहे. पण राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही छत्रपतींच्या मावळ्यांनी रयतेचा आवाज बुलंद करण्यासासाठी काढलेली यात्रा आहे. शिस्वराज्य यात्रेमुळे पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच असेल’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील समस्यांची सोडवणूक करण्यात सरकार कसं अपयशी ठरलं आहे, हे आम्ही या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू. फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाजाच्या समस्या या यात्रेच्या माध्यामातून मांडल्या जातील असंही कोल्हे यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी सोपवली आहे. या यात्रेद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.
शिवनेरीवर महाराजांचे आशीर्वाद घेऊन शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात
राज्यात पावसाचा कहर; खान्देशाला पुराचा सर्वाधिक फटका, अनेक गावं पाण्याखाली
काश्मीर प्रश्न सोडवणाऱ्या अमित शहांना ‘या’ लेखिकेने दिले वाहतूक समस्या सोडवण्याचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

