Share

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक; प्रसंगी यासाठी जीवही देऊ : अमित शाह

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. तसेच ही दडपशाही असल्याचं नारा दिला आहे.

हे विधेयक मांडताना अमित शाह यांनी काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीर हासुद्धा प्रदेश येतो. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर, पण पाकव्याप्त काश्मीरही आमचाच आहे अस आक्रमक विधान केले आहे. या चर्चेत कॉंग्रेसच्या नेत्यांनीही सहभाग नोंदवला यात अधीर रंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

दरम्यान, कलम ३७० हटवण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्या दृष्टीने देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोमवारी पहिली प्रक्रिया पार पडली. राज्यसभेत ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने संमत झाला. मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आवाज उठवला. ही प्रक्रिया घटना बाह्य पद्धतीने सुरु असून जम्मू काश्मीरमध्ये सरकार नसताना देखील त्यांचे मत गृहीत धरून हे कलम रद्द केले जात असल्याचा विरोधकांकडून सांगितल जात आहे.

तसेच मोदी सरकारच्या या निर्णयानंतर देशात उत्साहाचे वातावरण आहे. तर संपूर्ण देशवासियांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. मोदी सरकारच्या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरचे विभाजन झाले आहे. जम्मू – काश्मीर स्वतंत्र केंद्रशासित राज्य असेल. तर लडाख हे विधानसभा नसलेले केंद्रशासित प्रदेश असेल. तसेच कलम ३७० मुळे काश्मीरचा इतका दिवस विकास होऊ शकला नाही, मात्र आता ३७० कलमची अडसर दूर झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये येत्या ५ वर्षात पुन्हा नंदनवन करून दाखवतो, असा शब्द अमित शहांनी सभागृहात दिला.

कलम 370 हटवल्यानंतर मोदींची होतेय शिवरायांशी तुलना

काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या आफ्रिदीवर होतेय चौफेर टीका

देशाच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू आहेत : बाळासाहेब थोरात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!