Share

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी छुपी जवळीक ? जयंत पाटलांनी केलं भाष्य

Published On: 

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे.

अशातच, गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याचे वृत्त पसरले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने ही भेट झाली नसल्याचं अंगात हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

तर, गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र यावर सार्वजनिकरित्या बोलण्यास टाळल्याने या भेटीचं गूढ अधिकच वाढलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. त्यांनी ही भेट झालीच नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, ‘भाजपशी कोणत्याही प्रकारची जवळीक नसून आमची विचारधारा वेगळी आहे. यामुळेच पवार साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या चर्चांमध्ये काहीही अर्थ नसून महाविकास आघाडी भक्कम आहे.’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!