Share

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनाम्याबाबत मौन सोडलं, म्हणाले…

Published On: 

नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणानंतर सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण बदलेले आहे. वाझे यांच्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्यात आले. यानंतर आता थेट गृहमंत्र्यांना देखील पदावरून दूर करण्याच्या चर्चा सध्या रंगली आहे.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात जवळपास २ तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कामांबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून नव्या नेत्याच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, गृहमंत्रीपदावरून उचलबांगडी होण्याचे वृत्त निराधार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना याबाबत त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून त्यांनी मौन सोडलं आहे.

‘आदरणीय पवार साहेबांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अँटीलिया प्रकरणाविषयी त्यांच्याशी चर्चा करून राज्यसरकार NIA ला तपासात संपूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती त्यांना दिली. तपासात जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांना सांगितले. यासोबतच, आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात पवार साहेबांची भेट घेतली व मागील २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी ATS व NIA ने केलेल्या तपासाची चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या,त्यात कोणतेही तथ्य नाही,’ असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!