नागपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांना थोडा खोकला जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करवून घेतली. त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले. यानंतरही त्यांनी कोरोनाशी संबंधित अन्य चाचण्या करवून घेतल्या. त्यामध्येही ते पॉझिटिव्ह आढळले. सध्या त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करवून घेतले आहे.
आमदार मुनगंटीवारांच्या कुटुंबातील काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनालाही गेले नव्हते. त्यानंतर त्यांनी घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करवून घेतली. त्यातही काही सदस्य पॉझिटिव्ह आढळले आणि आज त्यांचा स्वतःचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची व कुटुंबीयांची नियमांनुसार कोरोना चाचणी करवून घेण्याचे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.
My Covid -19 report has come positive , I have isolated myself and requesting people who came in my contact in past few days to take precautions , test for Corona and quarantine based on professional doctor's advise
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 19, 2020
सद्यःस्थितीत त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. घरातील उर्वरित सदस्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. यापूर्वी त्यांच्या मुंबई कार्यालयातील काही सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागाला पुराचा फटका बसल्याने त्यांनी या भागात सातत्याने दौरै केले. लॉकडाऊनच्या काळातही सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.
गेल्या महिनाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसभरात सरासरी 300 ते 400 कोरोना रुग्ण निघत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोनाने उद्रेक केला असल्याने सर्व नागरिकांनीही मास्क, सोशल डिस्टंसिंगसह सर्व काळजी घेण्याचे आवाहन आमदआमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे वीरपुत्र सचिन जाधव लडाखमध्ये शहीद!
- मराठा समाजाचे ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
- मराठा आंदोलन रोखण्यासाठीच मुंबईमध्ये जमावबंदी ; चंद्रकांत पाटलांचा आरोप
- संत तुकाराम नगर ते खराळवाडी मार्गावर पुणे मेट्रोची दुसरी चाचणी पार पडली
- #Breaking_News : मंत्री बच्चु कडू यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

