Share

पवारांच्या भेटीनंतर शिवसेनेने भूमिका बदलली, शेतकरी विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी ?

Published On: 

नवी दिल्ली : मोदी सरकारने मांडलेल्या शेतकरी विधेयकांना लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने आता आपली भूमिका बदलली आहे. सरकारने ही शेतकरी विधेयके ही संसदीय समितीकडे पाठवावीत, असा पवित्रा शिवसेनेने घेतल्याचे समजते. त्यामुळे रविवारी राज्यसभेत या विधेयकांच्या मंजुरीवेळी रंजक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेत ही विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपने पक्षादेश काढून सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास बजावले आहे. या विधेयकांना देशभरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील NDA जुना घटकपक्ष असलेल्या अकाली दलाने या विधेयकांविरोधात भूमिका घेतली होती. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता.

यानंतर आता शिवसेनेनेही आपली भूमिका बदलल्याने भाजपसमोर पेच उभा राहण्याची शक्यता आहे. शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीत शेतकरी विधेयकांना राज्यसभेत पाठिंबा देण्याविषयी खलबते झाल्याची चर्चा होती. यानंतर आज शिवसेनेने या विधेयकांना बिनशर्त पाठिंबा देण्याची आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राज्यसभेत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!