🕒 1 min read
जळगाव : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद झाले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले.
अवघ्या विशीत हौतात्म्य आलेल्या वीरपुत्राचे वडिल दिगंबर देशमुख यांनी मन हेलावून टाकणाऱ्या भावना व्यक्त केल्या. यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला परत गेला. 4 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं, कसे आहात विचारलं होतं. गुरुवारी दुपारी मला लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला. तो खूप जिद्दी होता, परिस्थितीची त्याला जाणीव होती, असं त्यांनी सांगितलं.
यश देशमुख गेल्या वर्षी मिल्ट्रीमध्ये भरती झाले होते. भारतमातेच्या रक्षणासाठी सेवा करताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना हौतात्म्य आलं. ‘त्यांनी मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’, असा विश्वास पुत्राच्या शहीदीनंतर वडिलांनी व्यक्त केल्यानं सर्वांचाच उर भरून आला.
थोड्याच वेळापूर्वी शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथे दाखल झालं आहे. दरम्यान गावी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी फलक लावत यशला श्रद्धांजली अर्पण केली जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत. गावकऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तिरंगा रॅली देखील काढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले, भारत नानांच्या जाण्याने शरद पवार हळहळले
- आता तरी सत्तेचा अहंकार सोडा आणि धमक्या देणे बंद करा – चंद्रकांत पाटील
- ‘रुक! अभी तय नहीं हुआ हैं…, किसके घर जाना हैं’, ईडी कारवाईवर राऊतांचा भाजप सरकारला टोला
- ‘मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा’
- ‘ईडीची कारवाई ही ऑपरेशन कमळची सुरुवात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

