Share

ईडीचा धडाका सुरूच : विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची १० तास चौकशी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेल्या आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे असलेल्या बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ‘ईडी’ने चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या परिमंडळ दोनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भोसले यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. तब्बल दहा तास त्यांची चौकशी करण्यात आली.

पुण्यातही त्यांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने चौकशी केल्याचे समजते.अविनाश भोसलेंच्या ईडी चौकशीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. पण संध्याकाळच्या सुमारास माध्यमांना त्यांची माहिती मिळाली. अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी झाल्याने राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने आज सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे ते सकाळी 10 वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान ईडीने त्यांच्याकडील काही कागदपत्रांची छाननी सुरू केल्याचं समजतं.

रात्री उशिरा ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर भोसले यांनी मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अचानक झालेल्या या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे.ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले विदेशी चलन प्रकरणात फेमा (FEMA) कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली व त्यांच्याकडील कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!