Share

NCP | राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, सांगितले त्यामागचे कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून अनेक पक्षातील नेते त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी राज्यातील राजकारणात खूप खळबळ माजली होती. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येतं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नेत्याने दिला राजीनामा?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा दोन दिवसांपूर्वीचं दिला असल्याचं समजतं आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी हालचाल पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हा राजीनामा का दिला?, यामगचे कारण देखील अशोक गावडे यांनी सांगितले आहे.

जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप वाढला आहे. गटबाजीला उधाण आलं आहे. हे सर्व मी कित्येक दिवसांपासून सहन करत होतो आणि याबद्दल मी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारही केली, परंतु दखल घेतली जात नसल्यानं मी राजीनामा दिला असल्याचं अशोक गावडे यांनी सांगितलं आहे.

तसेच, मी पडत्या काळात पक्षासाठी निस्वार्थीपणाने तन मन धनाने कामं केली. शरद पवार साहेब हे कायम माझ्या आदरस्थानी होते व राहतील, असं त्यांनी बोलून दाखवलं. त्याचप्रमाणे अशोक गावडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत असल्याचंं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!