Share

Rohit Pawar । “भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे, अन्…”; रोहित पवारांचं आव्हान

Published On: 

पुणे : पवारांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याच्या दृष्टीने भाजपाने ६ सप्टेंबरला श्रीगणेशा केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी बारामतीत जात भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्यासोबत हा गड जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचे थेट सांगत मिशन बारामतीच्या दृष्टीने रणशिंग फुंकले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक मुद्यांवर स्पष्टपणे मते मांडली होती. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी रोहित पवार पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. मात्र, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, असं म्हणत पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला.

तसेच पुढे ते म्हणाले कि, आधी चंद्रशेखर बावनकुळे, मग देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीही बारामतीत येणार आहेत. भाजपाच्या दाव्याप्रमाणे बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का?” असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!