Share

सुषमा स्वराज मला ‘शरद भाऊ’ म्हणायच्या, त्यांचे निधन धक्कादायक – पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. स्वराज यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा दिला आहे. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या, संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्व देशाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. असे ट्विट खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सुषमा स्वराज यांची दैदिप्यमान कारकीर्द

जन्म १४ फेब्रुवारी १९५२ हरयाणा राज्यातील अंबाला.

अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी

पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी

१९७३ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली

१९७५ मध्ये स्वराज कौशल यांच्याशी विवाह

वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री

१९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड

१९९० मध्ये राज्यसभा सदस्य

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री

नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज : फडणवीस

काश्मीरच्या मुद्द्यावरून काका-पुतणे आमने सामने, अजित पवारांनी केलं विधेयकाचं स्वागत

कलम ३७० हटवून ढासळलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा प्रयत्न तर नाही ना ? – अमोल कोल्हे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!