🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून अनेकदा टीका केली जाते. शुक्रवारी पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात शरद पवार आले होते. दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी ते आले आहेत अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र पवारांनी मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने ते मंदिरात गेले नाहीत, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हाच धागा पकडत आता भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
आज आपल्याला दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जायचे आहे, हे माहिती असूनही शरद पवार यांनी नॉनव्हेज का खाल्लं? शरद पवार यांची हिंदू देवी-देवतांवर श्रद्धाच नाही. त्यामुळे ते मंदिरात जातीलच कसे? मौलाना शरद पवार यांचा काल जुम्मा होता, त्यामुळेच त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचे कारण देत मंदिरात जाण्यास नकार दिला. एरवी शरद पवार हे इफ्तार पार्ट्या झोडत फिरत असतात. पण दगडुशेठच्या मंदिरात जाण्याची पवारांना एलर्जी आहे. त्यांनी कितीही कारणे दिली तरी शरद पवार हे नास्तिक आहेत, ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे. आता तुषार भोसले यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून कसा पलटवार केला जातो, हे पाहणे महत्वाचे आहे.
काय घडलं होतं ?
दगडूशेठ गणपती मंदिराच्या शेजारी असणारी गृह विभागाची जागा दगडूशेठ ट्रस्टला देण्याची अनेक दिवसांपासून ट्रस्टकडून मागणी होत होती. यासाठी शरद पवार हे भिडे वाडा आणि दगडूशेठ मंदिराच्या पाहणीसाठी पुण्यात आले होते. यानंतर ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. मात्र, मंदिराच्या आत प्रवेश न करता त्यांनी बाहेरूनच गणपतीला हात जोडले. मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने मी आज मंदिरात जाणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

