मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. दरम्यान,भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. बायडेन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला होता. मात्र या पावसातही बाइडेन यांनी जोरदार भाषण केले. गर्दी जमून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गेल्या वर्षी सातारा येथे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. फ्लोरिडात डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचीही पावसात सभा झाली होती. त्यामुळे त्यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर बिडेन यांचा पावसात भिजलेल्या सभेचा फोटो व्हायरल झाला असून ‘सातारा पॅटर्न’ अमेरिकेतही यशस्वी झाल्याची चर्चा सुरू आहे.
ज्यो बायडन यांची ही सभा त्यांच्या विजयासाठी महत्वाची ठरली अशी चर्चा आहे.यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलंय. ‘अमेरिकेतही महाराष्ट्राची पुनरावृत्ती… देशाचं सर्वोच्च नेतृत्व कसं असावं हे सातारच्या सभेतुन देशाने पाहिलं. त्याचीच पुनरावृत्ती ‘Joe Biden’ यांच्या विजयाने काल अमेरिकेने पाहिली. अमेरिकेचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा असाच आनंद प्रत्येक मराठी मनाला झालाय’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतही महाराष्ट्राची पुनरावृत्ती… देशाचं सर्वोच्च नेतृत्व कसं असावं हे सातारच्या सभेतुन देशाने पाहिलं.
त्याचीच पुनरावृत्ती 'Joe Biden' यांच्या विजयाने काल अमेरिकेने पाहिली.
अमेरिकेचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा असाच आनंद प्रत्येक मराठी मनाला झालाय .. pic.twitter.com/f3FWMypvBY— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका – ठाकरे
- मंदिरं उघडण्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जनतेसाठी वाईटपणा घेण्यास मी तयार!’
- परभावानंतर दिवस फिरले, मेलेनिया वाहिनी ट्रम्प तात्यांना सोडणार ?
- पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरलाय – जितेंद्र आव्हाड
- लोकशाहीचं रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका! – अमृता फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

