मुंबई- राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
आतापर्यंतचे सर्व सण साधेपणाने साजरे केले. गेले ८ महिने जनतेने जे सहकार्य केले त्याला तोड नाही. या सहकार्यामुळेच आपण तणावमुक्त आहोत. दुसऱ्या लाटेची चिंता आहे. ती येऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
‘सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, रोषणाई करा. आजूबाजूला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन प्रदूषण होणार नाही असे फटाके वाजवा. पोलीस, महसूल, आरोग्य सेवक, डॉक्टर अत्यंत तणावाखाली जनतेसाठी लढत आहेत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आता आपल्याजवळ मास्कशिवाय दुसरं शस्त्र नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेकी, आपण जिद्दीने कोरोनाचा आलेख खाली आणला आहे. आपल्याकडे मुंबईत हजाराचा आकडा शेकड्यात आला आहे, राज्यातही नियंत्रणात. पण दिल्लीत किंवा अन्य ठिकाणी आकडा वाढत चालला आहे. पाश्चिमात्य देशात देखील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- डॉक्टरांची मेहनत आली फळाला, लढवय्या पँथरने दिला कोरोनाला धोबीपछाड
- लोकशाहीचं रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका! – अमृता फडणवीस
- ‘मिलिंद सोमण, उम्र पचपन की और हरकते बचपन की…,’
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे


