वॊशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना परभावनानंतर आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. जो बायडेन यांच्या विजयाने ट्रम्प यांच्या कौटुंबिक जीवनात देखील परिणाम झाला आहे.
डेल मेल या वृत्तपत्रानं डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त दिलं आहे. मेलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगीच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं डेल मेलनं हे वृत्त दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेय की, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात १५ वर्षापूर्वी सुरु झालेलं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे.
व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफन ट्रंजेक्शनल असं म्हटलेय.
महत्वाच्या बातम्या
- डॉक्टरांची मेहनत आली फळाला, लढवय्या पँथरने दिला कोरोनाला धोबीपछाड
- माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे – अर्णब गोस्वामी
- ‘मिलिंद सोमण, उम्र पचपन की और हरकते बचपन की…,’
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे


