Share

मंदिरं उघडण्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जनतेसाठी वाईटपणा घेण्यास मी तयार!’

Published On: 

मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षण, कोरोनाचा प्रसार, अनलॉकमधील सूट, अनेक धर्मातील येणारे सण-उत्सवाचं वातावरण, शेतकऱ्यांना मदत, मेट्रो कारशेड यासारखे अनेक विषय सद्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह विरोधी पक्षांनी टीकास्त्र सुरूच ठेवलं आहे.

लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेली प्रार्थनास्थळे इतर सर्व गोष्टी सुरु केल्यानंतरही बंद असल्याने अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचं नुकसान होत असून भाविक व देवाची ताटातूट केली जात असल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक आंदोलनाचा बडगा उचलला आहे. तर, मनसेने देखील यावरून राज्य सरकारवर टीका केली होती.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सणांच्या शुभेच्छा देतानाच प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत देखील भाष्य केलं आहे. ‘दिवाळीनंतर मंदिरं खुली करणार असून त्यासाठी नियमावली बनवण्यात येईल. मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती, बालक जात असतात त्यामुळे तिथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच जनतेच्या आरोग्यासाठी मला वाईटपणा घ्यावा लागत असेल तर मी वाईटपणा घेण्यास तयार आहे’ असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या मागणीवर चपराक लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!