मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. दरम्यान, अमेरिेकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस निवडून आल्या आहेत. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या. त्या आफ्रिकन-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन महिला आहेत. कमला हॅरिस यांचा जन्म 1964 मध्ये ऑकलँडमध्ये भारतीय वंशाच्या श्यामला गोपालन हॅरिस आणि जमेकाई वंशाचे वडिल डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला.
या विजयानंतर कमला हॅरिस यांनी जनतेचं आभार मानलं आहे. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या असून ‘मी पहिली असेन, पण शेवटची नक्कीच नाही’ असा विश्वास देखील त्यांनी महिलावर्गाला दिला आहे. त्यांचा हा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी रिट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“कुडोस! अगदी खरे! लोकशाही एक स्थिती नाही, ती एक कृती आहे! याचा अर्थ असा की एखाद्या देशातील लोकशाही हमी दिली जात नाही, ती केवळ त्यासाठी लढायची आमची इच्छा तितकीच मजबूत आहे! तर, त्यास रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका!” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी कमला हॅरिस यांच्या विजयाचं स्वागत केलं आहे.
Kudos! Absolutely true ! Democracy is not a state, it is an act ! It means Democracy of a country is not guaranteed, its only as strong as our willingness to fight for it ! So, guard it & never take it for granted ! #KamalaHarris #America #India https://t.co/forJ4JQEWW
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे
- अर्णबच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार – राम कदम
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- ‘महाआघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा’; अण्णा हजारेंचा घणाघात
- ‘सरकारच्या बाजूने सदैव भुंकत राहणे ही देशभक्ती अन् भुंकणाऱ्यावर कारवाई केली की स्वातंत्र्याचे हवन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

