Share

NCP vs Mohit kamboj | “नादाला लागल्यावर आम्ही नांगरासकट बैल लावतो”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा कंबोज यांना इशारा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या कारवायांमुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक बडे नेते सध्या ईडीच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी “लवकरच राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता तुरुंगात जाईल”, असं ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं असून त्यावरून विरोधकांनी कंबोज यांना घेरलं आहे. आधी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केल्यांनतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनीही कंबोज यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“मोहित कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देताय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही नांगरासकट बैल लावतो. तुमची सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही… आ देखे ज़रा किसमें कितना है दम!”, असं ट्विट करत सुरज चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना इशाराच दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कंबोज यांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले कि, “मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा सवाल करत मोहित कंबोजचीदेखील चौकशी झाली पाहिजे. ईडी कुठे धाड टाकत आहे, हे जर त्याला माहीत असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का?” असा संतप्त सवाल करत कंबोज यांच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली.

तिसरा नेता कोण?
राष्ट्रवादीचे हे तिसरे आणि मोठे नेते कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!