वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात गेला. यावरुन सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं. याबाबत शिंदेंनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ उडवली आहे. अशातच आता राष्ट्रवादी पक्षाचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
क्लाईड क्रास्टो यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाः
देवेंद्र फडणवीसजी सांगतात “महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत गुजरातच्या पुढे”, ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेतली का? जर हे शक्य झाले नाही तर फडणवीसजी राजीनामा देणार का?, असा सवाल क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.
पाहा ट्विटः
देवेंद्र फडणवीसजी सांगतात "महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत गुजरातच्या पुढे", ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेतली का?
जर हे शक्य झाले नाही तर फडणवीसजी राजीनामा देणार का?
ज्या गतीने सर्व व्यवसाय गुजरातला पाठवत आहे, तो पर्यंत हे शक्य होणार नाही.#BJP— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो ???????? (@Clyde_Crasto) September 17, 2022
सर्वांत मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबविली?
यादरम्यान, ज्या गतीने सर्व व्यवसाय गुजरातला पाठवत आहे, तो पर्यंत हे शक्य होणार नाही. देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबविली? त्यातून निर्माण होणारे 5 लाख रोजगार कुणी थांबविले ? महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा 10 वर्ष पुढे जाण्यापासून कुणी रोखले? अशे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
पाहा ट्विटः
देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबविली?
त्यातून निर्माण होणारे 5 लाख रोजगार कुणी थांबविले ?
महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा 10 वर्ष पुढे जाण्यापासून कुणी रोखले?
(लघू उद्योग भारती, महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन मुंबई दि. 16 सप्टेंबर 2022) pic.twitter.com/rbI8oeI7UO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2022
महत्वाच्या बातम्याः
- Hero Splendor | हिरो स्प्लेंडर प्लस नवीन रंगात..! काय विशेष आहे ते जाणून घ्या!
- Health Hack | शाकाहारी लोकांनी प्रोटीन कसे आणि कुठून मिळवावे, जाणून घ्या!
- Raj Thackeray | प्रबोधानकार ठाकरेंच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंनी करुन दिली ‘त्या’ भाषणाची आठवण
- Supriya Sule | “… एवढ्या मोठ्या नाहीत ताई”, सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर संदीप देशपांडेंचा टोला
- Ambadas Danve | दिल्लीतील पातशहांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री हैद्राबादमध्ये गेले ; अंबादास दानवेंची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

