Share

Raj Thackeray | प्रबोधानकार ठाकरेंच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंनी करुन दिली ‘त्या’ भाषणाची आठवण

Published On: 

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती आहे. ते हिंदू संस्कृती, हिंदू धर्म ह्याचे जाज्वल्य अभिमानी होते. त्यांच्या जयंती निमीत्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विमध्ये त्यांनी प्रबोधनकारांच्या भाषणाची व्हिडीओ लिंक देखील शेअर केली आहे. तसेच त्यांच्या ट्विटला हिंदवीस्वराज्य आणि महाराष्ट्रधर्म असे हॅशटॅग देखील दिली आहेत.

राज ठाकरे यांचं ट्विटः

आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती. ह्या जयंतीनिमित्त आजोबांचं एक दुर्मिळ भाषण, इथे मुद्दामून देत आहे. ते जरूर ऐका. हे भाषण एका ‘कृतिशील विचारवंताच आहे. माझ्या आजोबांचा धर्म ह्या कल्पनेला विरोध नव्हता, उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रुचायची नाही, आणि असल्या भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत. थोडक्यात आख्ख आयुष्य त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भीती काढून, धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावं म्हणून वेचलं, असं राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाहा ट्विटः

यादरम्यान, ह्या भाषणात त्यांनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका असं आवाहन केलं आहे आणि हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका ह्याची आठवण करून दिली आहे. ‘रझाकारी औलादी डोकं वर काढत आहेत, अनेक ठिकाणी आया-बहिणींची छेड काढत आहेत, ह्या भाषणात आमच्या आजोबांनी जसं म्हणलं आहे तसं त्यांच्या गालावर वळ उठवा. आणि हे करताना मी ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा असला विचार करायची गरज नाही. कदाचित तुमचे नेते कच खातील, पण तुम्ही खाऊ नका… प्रबोधनकारांना अभिवादन करताना एक निर्धार प्रत्येकानेच केला पाहिजे कि, जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे पेटून उठायचं आणि अन्यायाचा फडशा पाडायचा… हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल !, असं देखील राज ठाकरेंनी लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!