टीम महाराष्ट्र देशा – श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. या निवडणूकीत सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला.
राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या सभापतीपदी गीतांजली शंकर पाडळे तर उपसभापतीपदी रजनी देशमुख यांची निवड करून पंचायत समिती वर काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीचा झेंडा फडकवला आहे .
भाजपचे सदस्य असलेले अमोल पवार यांचे जात पडताळणी प्रमाणपत वेळेत सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे भाजप चे ६ व आघाडीचे ६ असे समान संख्याबळ झाले होते.


