Share

महाराष्ट्रानंतर गोव्यात भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी !

Published On: 

गोवा : महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागलेला असताना आणि अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्या नंतर राज्यात राजकारणातील जादुगार शरद पवार यांचा करिष्मा चालला आणि महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. आता गोव्यात देखील ‘पवार पॉवर’ चालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबासह खाजगी दौऱ्यावर गोव्यात गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांशी निवडणूकपूर्व युतीची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. भाजपच्या पराभवाचे उद्दिष्ट ठेवून विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. तर, राष्ट्रवादी सध्या गोव्यात सात ते आठ जागा स्वबळावर लढवू शकतं, असं देखील ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे गोवा विधानसभेतील एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेससोबत निवडणूकपूर्व युती करायची झाल्यास 20 पेक्षा कमी जागा पक्षाने मान्यच करू नये,अशी मागणी पटेल यांच्याकडे केली आहे. यावर बोलताना पटेल म्हणाले, गोव्यात राष्ट्रवादीचे काम आणखी वाढविले जाईल. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचा किमान एक ज्येष्ठ मंत्री महिन्याला एकदा तरी गोव्यात येईल आणि येथील पक्षाच्या कामाचा आढावा घेईल. त्यामुळे आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे असं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!