Share

सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा उल्लेख करत मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले की, ‘या महिन्यात मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस झाल्याने काढणिस आलेला सोयाबीन, मुग, उडीद, भूईमुग, बाजरी, मका, कपाशी, तूर तसेच भाजीपाला यामध्ये मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरासरीच्या दिडपट पाऊस झाल्याने धरणे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे तसेच नद्या दुथड्या भरुन वाहू लागण्याने पुराचे पाणी शेतात पसरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.’

काही ठिकाणी विहीरी ढासळल्या असून, घरांची पडझड झाली आहे. तरी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. या निवेदनावर प्रदेश सरचिटणीस एकनाथ गवळी, पांडुरंग तांगडे, शिवाजी गावंडे, विलास मगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!