वैजापूर : तालुक्यातील सिंचनाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासंदर्भात मुंबई मंत्रालय येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बुधवारी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची (दि.१६) बैठक घेण्यात आली. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या महत्त्वपूर्ण सिंचनाच्या प्रकल्पासंदर्भात जयंत पाटील यांची विशेष भेट घेतली.
यात प्रामुख्याने मन्याड धरणाची उंची वाढविण्या संदर्भात चर्चा होऊन वाया जाणारे पाणी वाचविण्यासंदर्भाद चर्चा करण्यात आली. त्यावर साखळी बंधारे बांधण्यास संदर्भात कार्यकारी संचालक यांना सर्वेक्षण करून तात्काळ प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात आदेशित केले. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण असणाऱ्या हत्ती घोडा साठवण तलाव व चांदेश्वरी साठवण तलाव यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन प्रलंबित असणारे लघु प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूजना कार्यकारी संचालक यांना करून शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले.
शनिदेवगांव कमलापूर गोदावरी नदीवर महत्त्वपूर्ण असणाऱ्या बेरीज करणे संदर्भात तात्काळ सूचना देऊन दोन महिन्यात कामास प्रशासकीय मंजुरी देणे संदर्भात सूचना केल्या. या बैठकीसाठी जलसंपदा खात्याचे सचिव मुंडे, कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- महिला बचत गटाला मिळणार खते, बी-बियाणे विक्रीचा परवाना; लातूर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम
- मोठी बातमी : भारतीय संघाची घोषणा, ‘हे’ ११ शिलेदार बनवणार भारताला जगज्जेता
- विमानतळावर मिनिटा-मिनिटांचा ठेवला जातोय हिशोब, पार्किंगमध्ये ३ मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास वाहनांना दंड!
- राम मंदिरासाठीच्या निधीबाबत राष्ट्रवादीकडूनही चिंता, केली ‘ही’ मागणी
- भाजपला ‘शिवप्रसाद’ देणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

