Share

विमानतळावर मिनिटा-मिनिटांचा ठेवला जातोय हिशोब, पार्किंगमध्ये ३ मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास वाहनांना दंड!

Published On: 

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांना फक्त तीन मिनिटांचा वेळ दिला जात आहे. त्यापेक्षा जास्त वेळ वाहने थांबल्यास दंड आकारला जात आहे. ३ मिनिटात येणे व जाणे हे अतिशय धावपळीचे असल्याने तसेच आधीच कोरोनामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या टॅक्सी ड्रायव्हर पर्यटनाशी जोडलेल्या लोकांकडून या नवीन नियमाचा विरोध होत आहे. पार्किंगच्या दरामध्ये वाढ केल्याने त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. दोन ते अडीच महिने शहर संपूर्णतः अनलॉक होते. सात जून पासून हळूहळू शहर अनलॉक करण्यात आले. पर्यटन स्थळे उघडण्यास ही शासनाने परवानगी दिली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे पर्यटक व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच विमानतळावर बाहेर थांबण्यासाठी वाहनधारकांना जास्त रक्कम द्यावी लागत आहे.

तीन मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास वीस रुपये दंड आकारला जात आहे. याआधी हा वेळ पाच मिनिटांचा ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील दोन मिनिटे कमी केली आहे. वृद्ध अपंग लोकांना चालणे कठीण जाते तसेच पर्यटक विचारपूस करून त्यानंतर टॅक्सीत बसतात. यामध्ये वेळ जातो. त्यामुळे तीन मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अनेक वेळा विदेशी पर्यटक ओळख खात्री पटल्यानंतरच टॅक्सीमध्ये बसतात अशा वेळी जास्त वेळ लागला की सुरक्षारक्षक सिटी मारणे सुरु करतात. तसेच पार्किंगचे दर वाढविण्यात आले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे ड्रायव्हर त्रस्त झाले आहेत. त्यात हि दरवाढ त्रासदायक ठरत असल्याची प्रतिक्रिया टॅक्सी ड्रायव्हर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!