🕒 1 min read
पुणे: कर्नाटकात उडीपि आणि इतर शाळा आणि महाविद्यालयात सुरू असलेल्या हिजाब बंदी प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. कर्नाटकात हिजाब घालून आलेल्या मुलींना शाळा आणि महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला. त्याप्रकरणी खटला उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांना यामुळे सात दिवसांची सुट्टी दिली असून कलम १४४ अंतर्गत संचार बंदी लागू केली आहे.
पुण्यात गंज पेठ येथे महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि शहराचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली महिलांनी आंदोलन केले आहे. महिलांना सक्षम करणे सोडून हा काय वाद निर्माण झाला यावर त्यांचे आंदोलन सुरू आहे.
यावेळी बोलताना जगताप यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणाले, उडीपि येथे एका महिलेवर भाजप आणि RSS च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आम्ही या ठिकाणी ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी धोंडे खाल्ले त्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहोत. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार महिलांना स्वतंत्र देण्यास तयार नाही. ते महिलांना पुरुषप्रधान संस्कृतीच्या खाली ठेऊ पहात आहेत. या देशात कोणी काय घालावे? काय बोलावे? यावर सरकारचा अंकुश का ? असा सवाल जगताप यांनी केला.
महिला आणि मुली जेव्हा तोकडे कपडे घालून बागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरतात तेव्हा हेच भाजप आणि संघाचे लोक त्यांना जाऊन मारतात आणि त्रास देतात. आणि हेच लोक जेव्हा आता मुस्लिम मुली, स्त्रिया संपूर्ण अंगभर कपडे आणि हिजाब घालून फिरत आहेत तरी त्यांना त्रास देऊन आंदोलन करत आहेत. भाजप आणि संघाची ही कोणती भूमीका आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला व संघ आणि भाजप गोंधळला आहे असे देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- न्यायालयावर तुमचा विश्वास नाही का? – चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
- कर्नाटक हिजाब प्रकरण: शाळेच्या गणवेशाचे पालन करा – यास्मिन निगार खान
- टी -२० सामन्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यास पण मुकणार स्मृती मानधना, जाणून घ्या कारण
- उद्धव ठाकरेंच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल – रवी राणा
- पुष्पाची क्रेझ थांबेना! श्रीवल्ली गाण्यावर थिरकली राणू मंडल; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
