पुणे: भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशी आयोगाने २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान मुंबई येथील मलबार येथे शासकीय सह्याद्री अतिथीगृह येथे येत्या २१ ते २५ फेब्रवारी दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान सुनावणी ठेवली आहे. त्यासंबंधी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार, तत्कालिन अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, आयपीएस अधिकारी संदीप पखाले, पुणे ग्रामीणचे तत्कालिन पोलीस अधीक्षक सुवेज हक आणि हर्षाली पोतदार यांच्या साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोग नोंदवणार असल्याची माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पळणीटकरांनी दिली.
२३ आणि २४ फेब्रुवारी, असे दोन दिवस शरद पवार त्यांची साक्ष नोंदवणार आहेत. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेलला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, असा दावा खासदार शरद पवार यांनी केला होता. त्या दाव्यासंबंधित शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे, असे सचिव पळणीटकर यांनी सांगितले. कोल्हापूरचे तत्कालिन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हिंसाचारानंतर पेरणे फाटा येथील विजयस्तंभ व कोरेगाव भीमा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यामुळे आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी पुण्यात झालेल्या सुनावणी दरम्यान आयोगाला पत्र देऊन नांगरे-पाटलांना बोलावण्याची मागणी केली होती. नांगरे-पाटील २५ फेब्रुवारीला कागदपत्रे सादर करणार आहेत.
या आधी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांनी 74 पानी प्रतिज्ञापत्र सदर केले. चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची शुक्रवारी तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली होती. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला, त्यावेळी परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.
महत्वाच्या बातम्या:


