Share

जाणून घ्या ! २०११ मेगा ऑक्शन मधील सर्वात महाग खेळाडू आता कुठे आहेत?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलच्या इतिहासात २००८ पासून ४ वेळा म्हणजेच २००८ , २०११ , २०१४ आणि २०१८ मध्ये मेगा ऑक्शन झाला आहे. आता पाचव्यांदा २०२२ मध्ये आयपीएल मेगा ऑक्शन होणार आहे. हा आयपीएलच्या इतिहासातील हा शेवटचा मेगा लिलाव असण्याची शक्यता दर्शवली जात आहे. मेगा ऑक्शनपूर्वी १० संघानी काही खेळाडूंना रिटेन केले आहे. तर इतर ५९० खेळाडू ऑक्शनचा भाग असणार आहेत.

२०११ च्या मेगा ऑक्शन बद्दल बोलायचे झाले तर सर्वाधिक विकला जाणारा खेळाडू गौतम गंभीर होता, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले होते. गंभीर शिवाय इतरही अनेक खेळाडू होते जे महागड्या किमतीत विकले गेले होते. गंभीरने त्या हंगामात १५ सामन्यात ३७८ धावा केल्या होत्या. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स दोन वेळा आयपीएल चॅम्पियनही ठरला आहे. मात्र, त्याने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या, गौतम गंभीर पूर्व दिल्लीचा खासदार आहे आणि त्याला आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा मार्गदर्शक देखील बनवण्यात आले आहे. आयपीएल २०११ मेगा ऑक्शनमधील गंभीर नंतर दुसरा महाग खेळाडू युसूफ पठाण ठरला. कोलकता नाईट रायडर्सने युसुफला ९.६६ कोटीत विकत घेतले होते.त्याने १५ सामन्यात २८३ धावा केल्या. एवढेच नाही तर गोलंदाजी करताना त्याने १३ बळीही घेतले. सध्या त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अलीकडेच तो लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया महाराजा संघाकडून खेळताना दिसला होता.

रॉबिन उथप्पाला पुणे वॉरियर्स इंडियाने ९.६६ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यात त्याने १४ सामन्यांच्या २६४ धावा केल्या. सध्या तो आयपीएलमध्ये खेळत आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला ९. कोटीत खरेदी केले होते. तेव्हापासून रोहित मुंबईचा भाग आहे. आणि त्याच्या कर्णधारपदात मुंबईने ५ वेळा जेतेपद मिळवले. मेगा ऑक्शन पूर्वी मुंबईने त्याला १६ कोटीत रिटेन केले. दिल्ली डेअर डेव्हिल्सने इरफान पठाणला ८.७४ कोटीत विकत घेतले होते. त्याने १४ सामन्यात १५० धावा केल्या. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना ११ विकेट्स घेतल्या. आता तो भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी विविध देशांच्या टी २० लीगमध्ये सहभागी होतो, तसेच कॉमेंटेटरदेखील आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!