🕒 1 min read
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावर भाष्य केले होते. त्यांनी राज्य शासनाने हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन ३ जानेवारी रोजी सरकारला केले होते. तसेच निर्णय मागे न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून दिनांक १४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
यापूर्वी २०११ साली त्यांनी दिल्लीत जन लोकपाल विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी उपोषण केले होते. त्या उपोषणाला यश येऊन जनलोकपाल विधेयक मंजूर देखील झाले होते. आता यावेळी अण्णांच्या उपोषणाला महाविकास आघाडी सरकार झुकणार की, आणखी नवीन काही बदल राज्यात पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य शासन या निर्णयाने विद्यार्थी आणि महिलांच्या जीवाशी खेळ करत आहेत. केवळ महसूल वाढीचा विचार करून हा निर्णय त्यांनी घेतला असून इतर सामाजिक गोष्टींचा त्यांनी विचार केला नाही असे अण्णा हजारे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- अभाविपचे ‘विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन’
- Amaravati : शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला म्हणून महापालिका आयुक्तांवर शाई फेक
- केंद्रातलंही सरकार आम्ही ताब्यात घेऊ’; नवाब मलिकांचा इशारा
- शरद पवार, दानवे, कोल्हे या नेत्यांची दिल्लीत भेट; चर्चेला उधाण
- राऊतांच्या ‘त्या’ इशाऱ्याला मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांना अटक करणाऱ्या…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
