Share

महिलांच्या कपड्यांमुळेच बलात्काराचं प्रमाण वाढतंय; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

Published On: 

🕒 1 min read

कर्नाटक: कर्नाटक येथील हिजाब (Hijab) प्रकरणाचे पडसाद आता इतर राज्यांमध्ये देखील उमटत असल्याचे दिसत आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून हा वाद सुरू झाला आहे. आता हा वाद आणखी चिघळत असल्याचे दिसत आहे.

या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी प्रतिक्रिया देत, बिकिनी असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा, असं म्हणलं होतं. यावर कर्नाटक येथील भाजप आमदाराने प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य (M P Renukacharya) यांनी प्रियंका गांधी यांच्या प्रतिक्रियेवर ट्विट करत म्हणले आहे की, ‘बिकिनी’ सारखा शब्द वापरणे, हे खालच्या दर्जाचे विधान आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना मुलांनी पूर्ण कपडे घातले पाहिजेत. आज महिलांच्या कपड्यांमुळे पुरुष भडकतात म्हणून बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. हे योग्य नाही. आपल्या देशात महिलांना मान आहे, असं त्यांनी म्हणलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!