🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या हिजाब प्रश्नामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटकात काही दिवसांपूर्वी मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत आणि महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घातली होती. त्याविरोधात न्यायालयात विद्यार्थिनींनी दाद मागितली आहे. तत्पूर्वी एका मुस्लीम मुलीला कॉलेजमध्ये येण्यास रोखून ‘जय श्री राम’चे नारे देण्यात आले. याचा व्हिडिओहि सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच आता कॉंग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी (Congress MP Priyanka Gandhi) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“बिकिनी असो, घुंगट असो, जीन्स असो किंवा हिजाब असो तिने काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने सर्व स्त्रियांना दिला आहे. त्यामुळे महिलांचा छळ करणे थांबवा”, असे ट्वीट प्रियंका गांधी यांनी केले आहे.
Whether it is a bikini, a ghoonghat, a pair of jeans or a hijab, it is a woman’s right to decide what she wants to wear.
This right is GUARANTEED by the Indian constitution. Stop harassing women. #ladkihoonladsaktihoon
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 9, 2022
दरम्यान या प्रकरणावर देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत रोज नवं-नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. तर कर्नाटकातील वाढत्या वादामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) मोठा निर्णय घेतला असून राज्यातील पुढील तीन दिवसांसाठी सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘केंद्रातलंही सरकार आम्ही ताब्यात घेऊ’; नवाब मलिकांचा इशारा
- शरद पवार, दानवे, कोल्हे या नेत्यांची दिल्लीत भेट; चर्चेला उधाण
- राऊतांच्या ‘त्या’ इशाऱ्याला मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांना अटक करणाऱ्या…”
- धोनीचा CSK संघ ‘या’ खेळाडूवर लावणार बोली; IPLच्या मेगा ऑक्शनपूर्वीच समोर आली ‘मोठी’ बातमी!
- दोन दिवस डोंगरावर अडकलेल्या त्या ट्रेकरची अखेर आर्मीने केली सुटका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
