🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईबरोबरच ठाणे व नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाणी कायम होते. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागलं.
दरम्यान, साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली. सुदैवाने एका महिलेने वेळीच सावरल्याने ती मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली.
मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली नाही, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे विरोधकांनी मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्याच अनुषंगाने आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवरून शायरीतून टीका केली आहे.
इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब,
पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !#MumbaiRains #Monsoon2021 #Mumbai pic.twitter.com/zlrunfCwmR— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 16, 2021
‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब!’ असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. अमृता या विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. त्यातच आता त्यांनी मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. यावर शिवसेना पक्ष काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारचा गूण दहावी निकालाच्या वेबसाईटला लागला, दोन्हीही ठप्पच!’ भाजपचा टोला
- ‘श्रीपादचे छिंदम’चाळे सुरूच! टपरी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; अॅट्रॉसिटी दाखल
- ‘कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करा’, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स
- ‘..तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर गंगामय्याचा कोप नक्कीच होणार!’, वारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची टीका
- पंकजा मुंडे अडचणीत! वैद्यनाथ साखर कारखान्यावर ईपीएफओ कार्यालयाची मोठी कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
